आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताशी चांगले संबंध हवेत, पण काश्मीर निकाली काढा- पंतप्रधान नवाझ शरीफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- परस्परआदर आणि सार्वभौम समानतेच्या मुद्द्यांवर भारताशी चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. भारत हा महत्त्वाचा शेजारी देश असल्याची पुस्ती या वेळी जोडली. पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांच्यासोबत पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरीफ यांनी वरील मत व्यक्त केले.
बासीत यांनी शरीफ यांना भारत-पाकिस्तान संबंधाबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय उपखंडातील शांततेसाठी जम्मू-काश्मीरसह महत्त्वाचे मुद्दे सोडवणे आवश्यक अाहे, असे शरीफ म्हणाले. बासीत यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात काश्मीर फुटीरतावाद्यांसोबत चर्चा केल्यानंतर भारताने परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली होती. त्यानंतर दोन्ही देश अर्थपूर्ण चर्चा करण्यावर भर देत आहेत. मात्र, त्यासाठी समोरून प्रतिसाद येण्याची वाट पाहिली जात आहे.