आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Prime Minister Nawaz Sharif Departed For China

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ चीनच्या भेटीवर रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ चीन दौ-यावर शुक्रवारी रवाना होत आहेत. या भेटीत उभय देशांत ऊर्जाविषयक करारांवर भर देण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये शरीफ यांची चीन भेट रद्द झाली होती. बीजिंग येथे ८ नोव्हेंबर रोजी शरीफ हे चीनने आयोजित केलेल्या शेजारील देशांच्या नेत्यांच्या परिषदेत सहभागी होतील.
१० नोव्हेंबर रोजी सुरू होणा-या आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (अपेक) परिषदेच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांची बीजिंग भेट आयोजित करण्यात आली आहे. या चीन भेटीत शरीफ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व पंतप्रधान ली केगिआंग यांच्याशी चर्चा करतील.