आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान : पतीचे विवाहबाह्य संबंध; महिलेला विवस्त्र करुन मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - माणुसकीला काळिमा फासणारी घटना पाकिस्तानातील मुझफ्फरगड जिल्ह्यात घडली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधाची शिक्षा त्याच्या पत्नीला देण्यात आली. तिला गावातील पंचांसमोर विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मुझफ्फरगड जिल्ह्यातील कलसूम माई या महिलेचा विवस्त्र करुन छळ करण्यात आला. लाहोरपासून चारशे किलोमीटर दूर असलेल्या एका खेड्यात राहाणा-या कलसूमने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद बिलाल आणि इतर दोघांनी तिला विवस्त्र करुन मारहाण केली.

कलसूमचा पती मोहम्मद नवाज आणि बिलालची पत्नी यांचे अनैतिक संबंध आहेत. बिलालला याची माहिती मिळाल्यानंतर त्याने हा वाद पंचायतमध्ये उपस्थित केला. हा वाद मिटविण्यासाठी बिलाल आणि त्याच्या परिवाराने कलसूमलाही पंचायतीमध्ये हजर करुन अपमानित करण्याची मागणी केली. त्यानंतर पंचानी दिलेल्या आदेशानुसार कलसूमला विविस्त्र केले गेले. त्यानंतर बिलाल आणि त्याच्या नातेवाईकांनी पीडित महिलेला मारहाण केली.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बिलाल आणि त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच बरोबर पीडित महिलेच्या पतीविरोधातही बिलालच्या पत्नीला अपमानीत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.