Home | International | Pakistan | pakistan railway

डिझेल खरेदीइतपतही पाकिस्तानी रेल्वेकडे पैसा उपलब्ध नाही

वृत्तसंस्था | Update - Jul 21, 2011, 02:25 AM IST

पाकिस्तानच्या रेल्वे मंत्रालयाकडे दोन दिवसांचे डिझेल खरेदी करण्याइतपत पैसे नसल्याने येथील रेल्वे वाहतूक ठप्प होण्याच्या स्थितीत आहे.

  • pakistan railway

    लाहोर : पाकिस्तानच्या रेल्वे मंत्रालयाकडे दोन दिवसांचे डिझेल खरेदी करण्याइतपत पैसे नसल्याने येथील रेल्वे वाहतूक ठप्प होण्याच्या स्थितीत आहे. सरकार आपल्या मंत्रालयासोबत भेदभाव करत असल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप रेल्वेमंत्री गुलाम अहमद बिलौर यांनी केला आहे.
    मंत्रालयाकडे पैसा नसल्यामुळे कर्मचाºयांचे पगार तसेच निवृत्तीवेतन देण्यात अनेक अडचणी येत असल्याचे रेल्वेमंत्री बिलौर यांनी सांगितले. ते म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाची दुरवस्था दूर करण्यासाठी सरकारने ११.५ अब्ज रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. मात्र, आतापर्यंत एक रुपयाही देण्यात आला नाही. गेल्या आर्थिक वर्षात रेल्वेसाठी १३ अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, आतापर्यंत केवळ साडेतीन अब्ज रुपयेच मिळाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पुरेशी इंजिन्स असल्यास दररोज ४० मालगाड्यांची वाहतूक होऊ शकते. एवढेच नव्हे तर मंत्रालयाच्या उत्पन्नात दररोज २.५ कोटी रुपयांची कमाई होऊ शकते. रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी तत्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी बिलौर यांनी केली आहे. विशेष म्हणजे चीनकडून खरेदी करण्यात येणाºया इंजिनचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या खटल्यामुळे रेल्वे मंत्रालयाला दररोज चिनी कंपनीला दीड लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागते. ७५ रेल्वे इंजिन खरेदीच्या निर्णयासाठी नियमित सुनावणी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Trending