आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशी बेकायदेशीर प्रा. गिलानींचा दावा; पाकिस्तानमध्ये सरबजितच्या फाशीची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद/दिल्ली - संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरुला भारत सरकारने फाशी दिल्यानंतर आता पाकिस्तानमधील भारतीय कैदी सरबजित सिंगच्या फाशीची मागणी होऊ लागली आहे. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने ट्विट केले आहे की, 'भारताने अफजल गुरुला फाशी दिली आता, सरबजीत सिंगच्या फाशीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.'

मुंबईवर दहशतवादी हल्ला करणा-या अजमस कसाबला फाशी दिल्यानंतरही पाकिस्तानातून अशी मागणी झाली होती. त्याचबरोबर अफजलच्या फाशीनंतर सर्वस्तरातून प्रतिक्रीया उमटायला लागल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाने फाशीच्या शिक्षेचे स्वागत केले आहे. मात्र, सरकारने निर्णय घेण्यास उशिर केला अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील असेच काहीसे ट्विट केले आहे. ते लिहितात, 'देर आये, दुरुस्त आये.' भाजप प्रवक्ते राजीव प्रताप रुडी म्हणाले, 'अफजर गुरुला फाशी देणे हा योग्य निर्णय आहे. देशातील जनता या निर्णयाची वाट पाहात होती.'

काँग्रेस नेते जगदंबिका पाल म्हणाले, 'हा दहशतवाद्यांना एक संदेश आहे की, देशाच्या सुरक्षेला जे बाधा आणतील त्यांना कठोरात-कठोर शिक्षा दिली जाईल.'

(पुढील स्लाईडमध्ये, संसद हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले प्रा. गिलानी यांनी फाशी बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.)