आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात जम्हुरियत की हुकूमत? आज फैसला होण्याची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या राजकारणाला अनपेक्षित वळण देऊ शकणारा सर्वोच्च न्यायालयाचा फैसला सोमवारी येण्याची शक्यता आहे.या निकालावर देशात जम्हुरियत (लोकशाही) नांदणार की लष्कराची हुकूमशाही (हुकूमत) हे सुद्धा ठरणार आहे. त्याशिवाय सदर ए रियासत असिफ अली झरदारी,वजीर ए आझम युसूफ रझा गिलानी यांचे भवितव्यही निकालावर अवलंबून आहे.
सर्वोच्च न्यायालयात उद्या मेमोगेट प्रकरणी चौकशी आयोगाची सुनावणी सुरू होत आहे.तर राष्ट्राध्यक्ष झरदारीं विरुद्धचे भ्रष्टाचाराचे खटले एका फटक्यात माफ करणारा एनआरओ अध्यादेश प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. भ्रष्टाराचे खटले पुन्हा सुरू करणाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी झरदारी व पंतप्रधान गिलानी यांच्याविरोधात न्यायालय काय कारवाई करते याकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे.या दोघांविरोधात निकाल गेल्यास देशात राजकीय उलथापालथ होऊ शकते. या दोन खटल्यांबरोबर कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीचेही उद्या एक महत्त्वपूर्ण प्रस्तावावर मतदान घेण्यात येणार आहे.देशात लोकशाही मजबूत करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले त्याला पाठिंबा मिळवण्यासाठी आणि गिलानी सरकारवर विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदानही होणार आहे. दरम्यान, लष्कराशी संघर्षाच्या पवित्र्यात असलेल्या गिलानी यांनी शनिवारी लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी यांची भेट घेऊन पॅचअप करण्याचा प्रयत्न सुरू केला.
लष्कराची भूमिका निर्णायक
मेमोगेट प्रकरण असो वा एनआरओ दोन्ही प्रकरणात लष्कराची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मेमोगेट प्रकरणी झरदारी अडचणीत येऊ शकतात. तर गिलानी यांच्यावर एनआरओ प्रकरणी कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून भ्रष्टाचाराचे खटले चालविण्यासाठी न्यायालय लष्कराला कारवाईचे आदेश देऊ शकते.
मन्सूर इजाज साक्ष देणार
मेमोगेट प्रकरणी ‘कळीचे नारद’ ठरलेले अमेरिकास्थित पाकिस्तानी बिझनेसमन मन्सूर इजाज उद्या चौकशी आयोगासमोर साक्ष देणार आहेत. त्यांनी अद्याप व्हिसासाठी अर्जही केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खास चार्टर विमानाची सोय करण्यात आली आहे.रावळपिंडी येथील लष्कराच्या चकाला विमानतळावर हे विमान उतरणार आहे.त्यांच्यासोबत काही निवडक आप्तस्वकीय येणार आहे.त्यांना थेट चौकशी आयोगासमोर हजर करण्यात येईल अशी शक्यता आहे.
मेमोगेट काय आहे ?
2 मे रोजी ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खात्मा केल्यानंतर पाकिस्तानी लष्कर सरकार उलथवू शकते म्हणून झरदारी यांनी अमेरिकेचे लष्करप्रमुख माईक मुल्लेन यांच्याकडे मदतीची याचना करणारे पत्र पाठविले होते.हे प्रकरण उद्योगपती मन्सूर इजाज यांनी उघडकीस आणले होते.या घटनेनंतर लष्कर व सरकार यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला.मेमोगेट प्रकरणी सर्वोच्च् न्यायालयाने चौकशी आयोग नेमला असून उद्या याच आयोगासमोर इजाज यांची साक्ष आहे.
एनआरओ
सन 2007 मध्ये तत्कालीन लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्रीय समेट अध्यादेश (एनआरओ) काढून झरदारी,दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्यासह 8000 लोकांना भ्रष्टाचाराच्या खटल्यातून माफी दिली होती.हा अध्यादेश सन 2009 मध्ये सर्वोच्च् न्यायालयाने धुडकावून गिलानी सरकारला खटले पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते; परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वोच्च् न्यायालयाने गिलानी-झरदारी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर उद्या फै सला अपेक्षित आहे.
झरदारी-कयानी यांच्यात पॅचअप? तणाव निवळणार
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांची फाइल स्वत:चाच पक्ष उघडणार!
देशात सत्तांतर झाल्यास लष्कराला साथ देईन- मुशर्रफ