आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार नव्हे; प्रत्युत्तर - पाकिस्तान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भारतीय नागरी वस्त्यांवर गोळीबार करणार्‍या पाकिस्तानने नेहमीप्रमाणे उलट बोंबाबोंब सुरू केली आहे. पाकिस्तान कधीच गोळीबाराची सुरुवात करीत नाही, केवळ प्रत्युत्तर देतो, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. उभय देशांच्या पंतप्रधानांची बैठक झाल्यानंतरही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीबाबत प्रगती नाही, याबद्दल पाकिस्तानने निराशा व्यक्त केली.

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान भारतीय सरहद्दीतील नागरी वस्त्यांवरही गोळीबार करीत आहे. याबद्दल साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारतावर उलट आरोप केले. नवाझ शरीफ अमेरिका दौर्‍यावर असताना भारताने एलओसी व आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर पाकिस्तानच्या 27 चौक्यांवर गोळीबार केल्याचा दावा एजाज चौधरी यांनी केला. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीनंतरही गोळीबार सुरू असल्याबद्दल त्यांनी निराशाही व्यक्त केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) वर वातावरण भडकवण्यात पाकिस्तानला रस नाही. उलट भारतानेच गोळीबार के ला. शरीफ यांना भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध असावेत असेच वाटते, असे एजाज म्हणाले.