आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Says We Are Not Subservient To India, Claims J&K Not Part Of India

भारतीय सैन्यानेही केले 57 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्‍लामाबाद- भारतीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्‍तानचा खोडसाळपणा थांबलेला नाही. मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भारतीय सीमेवर गोळीबार करणार्‍या पाकिस्तानने आज (बुधवार) पुन्हा उलट्या बोंबा मारल्या. भारतीय सैन्यानेही सीमेवर 57 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केला आहे.

भारतावर पलटवार करत बासित म्हणाले शस्त्रसंधीचे उल्लंघन फक्त पाक सैन्याने केलेले नाही. भारतीय सैन्यानेही 57 वेळा पाकसीमेवर गोळीबार केला होता. काश्मीर मुद्या इतकाच सीमेवर होणार्‍या गोळीबाराच्या मुद्दा महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांनी या मुद्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. दोन्ही देशांना शांतता हवी आहे. दोन्ही देशांनी काश्‍मीरसह सर्व मुद्यांवर व्‍यावहारिक दृष्टीकोणातून गांभिर्याने काम करणे आवश्यक असल्याचेही बासित यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारताने आक्षेप घेतल्यानंतरही पाकिस्‍तानचे उच्चायुक्त अब्‍दुल बासित यांनी जम्‍मू-काश्‍मीरमधील फुटीरवादी नेत्यांची मंगळवारी रात्री भेट घेतली. आम्ही भारताचे गुलाम नाही. त्यामुळे भारताचे आदेश का पाळायचे असेही अब्दुल बासित यांनी यावेळी म्हटले.

भारताने दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही अब्दुल बासित यांनी सांगितले. दुसरीकडे, दोन्ही देशांच्या परराष्ट्र स्तरावरील चर्चा रद्द केल्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्‍तानी जवानांनी जम्‍मू-काश्‍मीरच्या सीमेवर मंगळवारी रात्री पुन्हा गोळीबार केला.

काश्‍मीर भारताचा भाग नव्हे तो वादग्रस्त प्रांत...
पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता तसनीम असलम म्हणाले की, पाकिस्तान भारताचा गुलाम नाही. भारत सांगेल तसे आम्ही वागू शकत नाही. पाकिस्‍तान एक स्वतंत्र देश आहे. काश्मीर हा भारताचा भाग नाही. काश्मीर हा एक वादग्रस्त प्रांत असून पाकिस्तानचाही त्यावर न्यायहक्क आहे.

सीमेवर पाककडून पुन्हा गोळीबार...
पाकिस्‍तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्‍मू-काश्‍मीरमधील मेंढर भागात पाक सैन्याने मंगळवारी रात्री पुन्हा एकदा गोळीबार केला. पाकिस्‍तानी रेंजर्सनी मेंढरमधील हमीरपूर येथील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही पाकला प्रत्युत्तर दिले. याआधी 24 तासांपर्यंत लाइन ऑफ कंट्रोल आणि आंतरराष्‍ट्रीय सीमेवर शांतता होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, भारताने आक्षेप घेतल्यानंतरही अब्दुल बासित भेटले फुटीरवाद्यांना...
(फोटो: पाकिस्‍तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित)