आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan SC Dismisses Contempt Of Court Petition Against Pervez Musharraf News In Divya Marathi

मुशर्रफांविरोधात अवमान याचिका फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध दाखल अवमान याचिका सोमवारी फेटाळली. मौलवी इक्बाल हैदर यांनी याचिका दाखल केली होती.

मुशर्रफ यांनी गृह मंत्रालयाला परदेश दौरा नियंत्रण यादीतून आपले नाव वगळण्यासाठी अर्ज दिला आहे. त्यांनी अर्ज करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने हैदर यांच्या याचिकेवर आक्षेप व्यक्त केला. या प्रकरणात त्यांचा संबंध नसल्यामुळे याचिका फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, याआधी मुशर्रफ यांचे नाव परदेश दौरा नियंत्रण यादीतून वगळले जात असेल तर आपणास अडचण नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. यानंतर मुशर्रफ यांनी गृह मंत्रालयाकडे अर्ज केला होता.