आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Stand Will Change After Terror Attack On Peshawar Army School

ANALYSIS: पेशावर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकच्या नापाक भूमिकेत हे 10 बदल होतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पाकिस्तानचा राष्ट्रध्वज.)
पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर पाकिस्तान तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात निरपराध चिमुकले मृत्युमुखी पडले. जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानमध्ये तर तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पेशावरमध्ये सर्वपक्षिय बैठक घेतली. फाशीच्या शिक्षेवर असलेली बंदी मागे घेतली. लष्कर प्रमुख राहिल शरिफ अफगाणिस्तानच्या सरकारची भेट घेण्यासाठी काबुलला रवाना झाले. या सगळ्या घडामोडी होत असताना एक प्रश्न सारखा सर्वसामान्यांच्या मनात उमटत होता, की या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या भूमिकेत काय बदल होतील... याचा भारत-पाकिस्तान द्विपक्षिय संबंधांवर काय परिणाम होईल... याचा आम्ही केलेला ऊहापोह...
पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी एवढा नियोजित हल्ला केला. यापूर्वी पाकिस्तान समर्थित दहशतवादी भारतात आणि इतर देशांमध्ये कारवाया करीत होते. त्याची झळ कधी पाकिस्तानला बसली नव्हती. पण गेल्या दोन-चार वर्षांमध्ये पाकिस्तानमध्येही दहशतवादी हल्ले होण्यास सुरवात झाली होती. याला शिया-सुन्नी असा रंगही मिळत होता. पण पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याने पाकिस्तानसह अवघे विश्व हादरुन गेले. शाळेतील चिमुकल्यांना अतिशय क्रूरपणे ठार मारण्यात आले. याची धग समाजमनाला विचलित करणारी होती. त्यातून पाकिस्तानचे सरकार अस्थिर होते, की काय अशी भीतीही व्यक्त करण्यात येऊ लागली. आता पाकिस्तान काय पावले उचलेल, काय निर्णय घेईल... याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
पुढील स्लाईडवर वाचा, पेशावर दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तानच्या भूमिकेत काय बदल होतील... त्याचा आंतरराष्ट्रीय, भारत-पाकिस्तान राजकारणावर काय परिणाम होईल... काश्मिरसंदर्भात असलेली पाकिस्तानची भूमिका बदलेले...