आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Successfully Test Fires Hatf 4 Ballistic Missile

पाकिस्तानने घेतली हत्फ 4 क्षेपणास्त्राची चाचणी, लक्ष्‍यावर भारतीय शहर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानने सोमवारी (ता.17) भूपृष्‍ठावरुन पृष्‍ठावर मारा करणा-या शाहीन हत्फ 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. त्याची मारक क्षमता 900 किलोमीटर इतकी आहे. क्षेपणास्त्रातून अणुवस्त्र वाहून नेण्‍याची क्षमता आहे. हत्फ 4 च्या लक्ष्‍यावर भारताचे दिल्ली शहर येते. इस्लामाबाद ते दिल्ली यातील अंतर 689 किलोमीटर आहे.
चार दिवसांपूर्वी पाक‍िस्तानने हत्फ 6 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. त्याची मारक क्षमता 1 हजार 500 किमी आहे. हत्फ 4 क्षेपणास्त्राचा उद्देश डिझाइन आणि तंत्रज्ञानाची पुनर्चाचणी घेणे हा उद्देश असल्याचे पाकिस्तान सेनेने सांगितले. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हत्फ 4 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्‍यात आल. यानिमित्त पाकिस्तानचे राष्‍ट्रपती ममनून हुसेन आणि पंतप्रधान नवाज शरीफने वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.हत्फने अचूक लक्ष्‍य करता येऊ शकते, असे नौसैनिक दलाचे चीफ अॅडमिरल मोहम्मद जकाउल्लाह यांनी सांगितले.