आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Supreme Court Sanctioned Parvez Mushraff Bailout

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने परवेझ मुशर्रफ यांना केला जामीन मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावळपिंडी - पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना नवाब बुग्ती हत्याकांड प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. दोन खटल्यांत त्यांना याआधीच जामीन मिळाला आहे. त्यांची घरातील नजरकैदेतून सुटका होऊ शकते. त्यामुळे मुशर्रफ उपचाराच्या नावाखाली दुबईत जाण्याची शक्यता आहे.


तीन न्यायमूर्तींच्या पीठाने बुधवारी मुशर्रफ यांची बुग्ती हत्या प्रकरणात 10-10 लाख रुपयांच्या दोन जातमुचलक्यांवर सुटका केली. बुग्ती हत्या प्रकरणात मुशर्रफांविरुद्ध कटातील सहभागाचा पुरावा आढळला नाही, असे न्यायपीठाने म्हटले आहे. त्याआधी बलुचिस्तान उच्च न्यायालयाने जामिनास नकार दिला होता. मुशर्रफ यांच्या फार्महाऊसवरील सुरक्षा काढून घेतली जाऊ शकते, असे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. मुशर्रफ आपल्या फार्महाऊसमध्ये नजरकैद आहेत. तेथे 300 सुरक्षा जवान तैनात आहेत. मुशर्रफ यांची बुधवारी किंवा गुरुवारी सुटका होऊ शकते. असे असले तरी मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगच्या प्रवक्त्या आसिया इशाक यांनी ते देश सोडणार नसल्याचे सांगितले.