आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Taliban Chief Hakimullah Mahsood Killed In Drone Attack

पाकिस्‍तान तालिबानचा म्‍होरक्‍या हकीमुल्‍ला ड्रोन हल्‍ल्‍यात ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील तालिबान या कुख्‍यात दहशतवादी संघटनेचा अतिरेकी संघटनेचा प्रमुख हकीमुल्ला महसूद हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. या ड्रोन हल्ल्यात महसूदसह पाच दहशतवादी ठार झाले आहेत. त्‍यात महसूदचे दोन सुरक्षारक्ष तारिक महसूद आणि अब्दुल्लाह यांचाही समावेश आहे. पाकिस्‍तानच्‍या वायव्‍येकडील वझिरीस्‍तान भागात ड्रोन हल्‍ला करण्‍यात आला होता. महसूद ठार झाल्‍याच्‍या वृत्ताला रात्री उशीरा दुजोरा मिळाला.

ड्रोन हल्ल्यानंतर मुळे पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी बातचीत केली आहे. वझिरिस्तानातील मुख्यालय मीरानशाहजवळ एक गाडी आणि घरावर हा ड्रोन हल्ला करण्यात आला. ज्या घरावर हा हल्ला कऱण्यात आला ते घर हकीमुल्ला महसूदचे होते. याशिवाय जी गाडी या हल्ल्यात उडवण्यात आली ती हकीमुल्लाच वापरतं होता.

पाकिस्तानी तालिबानसोबत चर्चा करण्यात येईल, अशी घोषणा नवाज शरीफ यांनी एका दिवसापूर्वीच केली होती. त्यानंतर आज लगेचच हा हल्ला झाला आहे. महसूद यात मारल्‍या गेल्‍यामुळे तालिबान आणि पाकिस्‍तान सरकारमधील चर्चेला खिळ बसू शकतो. तसेच पाकिस्‍तानातील परिस्थिती चिघळू शकते.