आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान- तालिबानी शांती चर्चा फिसकटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- 2010 मध्ये अपहरण करण्यात आलेल्या 23 जवानांचा शिरच्छेद करण्यात आला होता, अशी कबुली तालिबानी बंडखोरांनी दिल्याने पाकिस्तानी सरकारचा तिळपापड झाला. त्यामुळे सोमवारी होणारी शांती चर्चा फिसकटली आहे. तालिबानकडून हत्येची कबुली दिल्यानंतर प्रस्तावित चर्चा रद्द करण्याचा निर्णय सरकारच्या वाटाघाटीतील अधिका-यांनी घेतला. चर्चेचे मुख्य समन्वयक इरफान सिद्दिकी यांनी सरकारची भूमिका जाहीर केली. देशाच्या सीमेवरील सैनिकांच्या तुकडीतील 23 जवानांचे अपहरण करून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यामागे तालिबानचा हात असल्याचे या दहशतवादी संघटनेने
स्वत:च स्पष्ट केले
आहे. 2010 मध्ये शॉनगरी तपासनाक्यावर जवानांचे अपहरण करण्यात आले होते. वाटाघाटी करणाºया समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. सध्याची स्थिती आणि भविष्यातील नियोजनासंदर्भातील मुद्यांवर चर्चा करण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले.