आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Taliban Form Fidayeen Unit To Free Jailed Militants

पाकिस्तानी जवानाचे फिदायीन युनिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानी हवाईदलाच्या अधिका-याने फिदायीन युनिट (आत्मघाती पथक) तयार केले असून हे तो पाकिस्तानी तालिबान,इस्लामी मुव्हमेंट ऑफ उझबेकीस्तानला मदत करतो.आत्मघातकी पथकाचे नाव अन्सार -अल -असीर (कै द्यांचा सहकारी ) असे असून त्याचा प्रमुख अदनान रशीद हा पाकिस्तानच्या हवाई दलात होता.कै द्यांना तुरुंगातून सोडवणे,हल्ले करणे या फिदायीन गटाचा रशीद हा ऑपरेशनल कमांडर आहे. त्याच्यासोबत यासीन चुका आणि अब्दुल हकीम हे दोघे आहेत. चुका हा जर्मनीतील मोस्ट वाँटेड अतिरेकी आहे. तो वजिरीस्तानमधील इस्लामी मुव्हमेंट ऑफ उझबेकचा दहशतवादी आहे.तर हकीम हा रशियन आहे. रशीद सन 1997 मध्ये हवाईदलात भरती झाला.लष्करशहा मुशर्रफ यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या आरोपाखाली त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.गतवर्षी एप्रिल महिन्यात 200 तालिबानी दहशतवाद्यांनी तुरुंगावर हल्ला क रुन त्याची सुटका केली होती.या हल्यावेळी 384 अतिरेक्यांनी पलायन केले होते.