आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan Test Second Hatf Missle, Second Test Within Four Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानची हत्फ-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ;4 दिवसांत दुसरी चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इस्लामाबाद- पाकिस्तानची अण्वस्त्र सज्जता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चार दिवसांपूर्वीच्या हत्फ चाचणीनंतर शेजारी राष्ट्राने शुक्रवारी पुन्हा एकदा यशस्वी चाचणी घेतली. आण्विक क्षमतेच्या हत्फ-2 चे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. हत्फ-2 किंवा अब्दली असे या क्षेपणास्त्राचे नाव असून जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारे हे आखूड पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. 180 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य टिपणा-याया क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी चाचणी कोठे करण्यात आली, हे मात्र जाहीर करण्यात आले नाही. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता, प्रचंड अचूकता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.

दोन प्रकारची साधने
अण्वस्त्रांचा वापर करण्याची पाकिस्तानकडे दोन साधने आहेत. हवाई मार्गाने आणि लष्करी दलाकडून त्याचा वापर करता येऊ शकेल, अशी साधने पाकिस्तानकडे उपलब्ध आहेत. एफ-16 हे लढाऊ विमान पाकिस्तानने अमेरिकेकडून खरेदी केले होते. त्याचाही वापर केला जाऊ शकतो.
वापराची भीती
भारताने तांत्रिक पातळीवर श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवाय भारताच्या निशाण्यावर पाकिस्तानातील महत्त्वाची ठिकाणेदेखील आहेत. परिस्थिती अनुकूल वाटली तर पाकिस्तान क्षेपणास्त्र वापरण्याचा विचार करू शकते, अशी भीतीही अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.