आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Using Militants Pentagon Read More At Divya Marathi.Com

REPORT: भारताशी छूपे युद्ध करण्यासाठी पाकिस्तान घेत आहे दहशतवाद्यांची मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: पाकिस्तानच्या फाटा भागात असलेले दहशतवादी

नवी दिल्ली - पाकिस्तानात राहून अफगाणिस्तान आणि भारतामध्ये हल्ले घडवून आणणा-या दहशतवाद्यांचे पितळ अमेरिकेने उघडे केले आहे. दर 6 महिन्यात अफगाणिस्तानातील परिस्थितीवर 'पेंटागॉन'द्वारा अमेरिकेतील संसदेत अहवाल सादर करण्यात येतो. यावेळी सादर करण्यात आलेल्या 100 पानी अहवालात असे सांगण्यात आले आहे की, 'पाकिस्तान भारतीय सैन्याच्या विरोधात छूपे युद्ध करण्यासाठी दहशतवाद्यांची मदत करत आहे. विशेष म्हणजे हे दहशतवादी पाकिस्तानात आश्रय घेत असून अफगाणिस्तान आणि भारतात दहशतवादी कारवाया करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, पाकिस्तान एकीकडे अफगाणिस्तानमध्ये शांती आणि स्थिरता स्थापित करण्याच्या गप्पा करत आहेत, करत आहे. तर, दुसरीकडे याच दहशतवाद्यांचा वापर करून बाजूच्या राष्ट्रांमध्ये अस्थिरता निर्माण करत आहे या दहशतवाद्यांच्या संघटनांमुळे अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय नात्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा मे 2014 मध्ये अफगाणिस्तानातील हेरात शहरात असलेल्या भारतीय कॉन्सुलेटवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे उदाहरण देत असे म्हटले आहे की, हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाच्या ठिक 3 दिवस आधी करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा हिंदू राष्ट्रवादी समूहांच्या जवळ राहणारी अशी असल्याने हे तथ्य हल्ल्याच्या टाइमिंगकरता जबाबदार ठरू शकते. दरम्यान, या हल्ल्यासाठी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा जबाबदार असल्याचे जून 2014 मध्ये अमेरिकेतर्फे जाहीर करण्यात आले होते.