फाइल फोटो - पेंटागॉन
न्यूयॉर्क / वॉशिंग्टन - भारतीय लष्कराचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान दहशतवादी गटांचा वापर करत आहे, असा अहवाल अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकन काँग्रेसला सादर केला आहे. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला आहे.
दहशतवाद्यांच्या सुरक्षित ठिकाणांबाबत पेंटागॉनने १०० पानांचा सहामाही अहवाल तयार केला आहे. तो अमेरिकन संसदेला सादर करण्यात आला असून त्यात ही माहिती आहे.
अहवालात म्हटले आहे की, अफगाणिस्तान आणि भारताला निशाणा बनवणारे दहशतवादी पाकिस्तानसाठी काम करत आहेत. त्यांचा उद्देश अफगाणिस्तान आणि क्षेत्रीय स्थिरता यांना नुकसान करणे हा आहे. अफगाणिस्तानमधील प्रभाव कमी झाल्याने तसेच भारताच्या बलशाली लष्कराचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान या दहशतवादी गटांचा वापर
आपल्या फायद्यासाठी करत आहे.
हल्ल्यामागे षड्यंत्र
‘पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना हिंदू कट्टरवादी गटांच्या जवळचे मानले जाते. त्यांच्या शपथविधीआधी तीन दिवस झालेल्या हल्ल्यामागे हेच कारण असावे.’ मे महिन्यात शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या चार दहशतवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता.
भारताची स्तुती
‘सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तान दक्षिण आशियासाठी फायदेशीर ठरेल याची जाणीव असल्याने भारत अफगाणिस्तानला सहकार्य करत आहे. ’ अशा शब्दांत भारताची स्तुती करण्यात आली आहे.
आमचा दावा खरा ठरला
पाकिस्तानी लष्कर भारताच्या विरोधात अतिरेक्यांचा वापर करत आहे या आमच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. पाक दहशतवादी कारवायांत सहभागी आहे हे जग मान्य करत आहेत.
- अकबरुद्दीन, परराष्ट्र मंत्रालय