आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Will Develop Laden\'s Abotabad House As A Amusement Park

लादेनचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी पाकिस्तान उभारणार मनोरंजन पार्क !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर- अलकायदाचा म्‍होरक्‍या ओसामा बिन लादेनला ज्‍या पाकिस्‍तानमधील अबोटाबाद शहरात ठार मारण्‍यात आले होते. त्‍या शहरात मनोरंजन पार्कची उभारणी करण्‍यात येणार असून त्‍यासाठी एका खासगी कंपनीकडून तीन कोटी डॉलरची गुंतवणूक करण्‍यात येणार आहे. लादेनला याच शहरात 2011 मध्‍ये अमेरिकेच्‍या लष्‍कराने कारवाईत मारले होते.

या पार्कमध्‍ये प्राणी संग्रहालय, वॉटर स्‍पोर्ट्स, एक छोट्सं गोल्‍फ कोर्स, रॉक क्‍लायम्बिंग आणि पॅराग्‍लायडिंगची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. हे मनोरंजन पार्क पूर्ण होण्‍यास पाच वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती प्रांतीय पर्यटन राज्‍यमंत्री जमालुद्दीन खान यांनी दिली.

वर्ष 2011 मध्‍ये अमेरिकेच्‍या विशेष पथकाने अल कायदाचा प्रमूख ओसामा बिन लादेन याला इथे मारल्‍यानंतर हे शहर चर्चेत आले होते. अमेरिकेच्‍या या कारवाईमुळे पाकिस्‍तान आणि अमेरिकेच्‍या संबंधामध्‍ये कटूता निर्माण झाली होती. लादेनने अबोटाबादमध्‍ये एका मोठया इमारतीत आपले बस्‍तान बसवले होते. मात्र, त्‍याच्‍या मृत्‍यूनंतर ही इमारत पाडण्‍यात आली होती.