आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Drone Attack Kill 8 Terrorist In Afghanistan

Hang Till Death: या दहशतवाद्याला पाकिस्तान प्रथम चढवणार फासावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावळपिंडी (पाकिस्तान)- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मृत्युदंडावरील बंदी उठवल्यानंतर तब्बल 4,500 दहशतवाद्यांना फासावर चढवले जाणार आहे. या दिशेने निर्णायक पाऊले उचलण्यात आले असून 17 दहशतवाद्यांचा कुटुंबीयांना फाशीच्या शिक्षेची सुचना देण्यात आली आहे. त्यापैकी शकील ऊर्फ डॉ. उस्मान याला येत्या चोविस तासांत प्रथम फासावर चढवले जाणार असल्याचे समजते. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय दलात डॉ. उस्मान जवान होता. 2009 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील मुख्यालयावर दहशतवादी हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. फैसलाबाद येथील कारागृहात त्याला फाशी देण्यात येणार आहे. त्याच्या भावाला त्याची भेट घेण्यास सांगण्यात आले असून तोच त्याचा मृतदेह घेऊन जाणार आहे.
नवाझ शरीफ यांनी फाशीवरील स्थगिती उठवल्यावर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी त्याच्या ब्लॅक वॉरंटवर सही केली होती.
पुढील स्लाईडवर वाचा, पाकिस्तानच्या खैबर सीमेवर ड्रोन हल्ल्यात आठ दहशतवादी ठार... लाल मशिदीसमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त...