आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Will Instituted Second Capital, 12 Billion Dollars Expenditure Expect

पाकिस्तान स्‍थापन करणार दुसरी राजधानी, 12 अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये दुसर्‍या राजधानीची स्थापना करण्यात येणार असून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी 12 अब्ज डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित आहे. ही राजधानी मार्गल्ला पर्वतीय भागात तयार करण्यात येणार असून इस्लामाबादला जोडूनच असेल.

पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या आदेशानुसार हा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. राजधानी विकास प्राधिकरण (सीडीए) त्यावर काम करत आहे. त्यासाठी 25 हजार एकर भूसंपादन करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यातून बहुद्देशीय क्षेत्र विकास प्रकल्प पूर्ण केला जाईल.


कशी असेल दुसरी राजधानी?
शरीफ यांच्या संकल्पनेनुसार नवीन इस्लामाबाद आणि जुने इस्लामाबाद यांना जोडणारा एक बोगदा तयार करण्यात येणार आहे. नवीन इस्लामाबाद संपूर्ण मार्गल्ला प्रदेशात पसरलेले असेल. राजधानीच्या ब्लू एरिया ते रावतपर्यंतच्या राजमार्गाचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. तो 8 ते 10 पदरी होणार आहे.