आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Woman News In Marathi, Crime In Pakistan, Gang Rape

भावाच्या प्रेमाचा बदला घेण्यासाठी बहिणीवर सामूहिक बलात्कार, गावात विवस्त्र फिरवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील एका तरुणाचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. याचा बदला घेण्यासाठी तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याच्या बहिणीचे अपहरण केले. तिचा दोघांसोबत निकाह केला. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एवढे केल्यानंतरही गावातून तिला विवस्त्र अवस्थेत फिरवले.
22 वर्षिय सनाउल्लाह याचे त्याच्या गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मुलगी मल्लाह जातीची आहे. दोघांच्या प्रेमसंबंधांना तरुणीच्या कुटुंबीयांचा प्रचंड विरोध होता. त्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध दर्शविला होता. यासंदर्भात मुलीच्या कुटुंबीयांनी जात पंचायतीकडे तक्रार दिली होती. जात पंचायतीत झालेल्या सुनावणीत सनाउल्लाह याच्या बहिणीचा निकाह मुलीचा भाऊ झाहिद अली याच्यासोबत लावण्यास सांगण्यात आले.
परंतु, या जबरदस्तीच्या निकाहाला सनाउल्लाह यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे झाहिदने सनाउल्लाह याच्या बहिणीचे अपहरण केले. जात पंचायतीच्या आदेशाप्रमाणे तिच्यासोबत निकाह केला. परंतु, पाचव्या दिवसानंतर त्याने तिला तलाख दिला. त्यानंतर झाहिदचा चुलत भाऊ नूर अहमद याच्यासोबत सनाउल्लाह याच्या बहिणीचा निकाह लावून देण्यात आला.
चार दिवसांनी झाहिदच्या कुटुंबातील चार सदस्यांनी सनाउल्लाहच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला विवस्त्र अवस्थेत गावातील एका झाडाला बांधले. आता सनाउल्लाहच्या कुटुंबीयांनी तिला आता परत न्यावे, असे सांगण्यात आले. तब्बल महिन्याभराच्या शारीरिक अत्याचारानंतर सनाउल्लाहची बहिण घरी परतली.
या पीडित मुलीने लालीअन येथील प्रथमश्रेणी दंडाधिकाऱ्याकडे तक्रार नोंदविली आहे.