आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Crises In Marathi, Imran Khan, Pakistan Tehreek e Insaf, Divya Marathi

इम्रान, कादरी यांचा चर्चेस नकार; पाकिस्तानमधील संघर्ष विकोपाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: इस्लामाबाद येथे जमलेले इम्रान खान समर्थक.)
इस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे(पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तेहरिकचे प्रमुख मौलवी ताहिरुल कादरी यांनी गुरुवारी सरकारसोबतच्या वाटाघाटीतून माघार घेतल्याने पाकिस्तानमधील सत्ता संघर्ष आणखी विकोपाला गेला आहे. इम्रान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देण्याचा लढा व्यक्त करत राष्ट्रव्यापी आंदोलनाची हाक दिली.
कादरी यांनी सरकारच्या प्रतिनिधींना भेटण्यास नकार देऊन असहकार आंदोलनाची घोषणा केली. दरम्यान, सरकारने पीटीआय व पीटीएच्या मागण्या मान्य केल्यास देशाला असंख्य आव्हानांना तोंड द्यावे लागेल, अशी भीती पंतप्रधान शरीफ यांनी पत्रकारांसोबतच्या बैठकीत व्यक्त केली.

संसदेतील एकूण १२ पक्षांपैकी ११ पक्षांचा सरकारला पाठिंबा आहे. आम्ही विरोधकांशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे शरीफ म्हणाले. दरम्यान, शरीफ यांचा राजीनामा आणि संसद विसर्जित करण्याची विरोधकांची मागणी पाकिस्तानी संसदेने फेटाळली.

निदर्शकांना हुसकावण्याबाबत आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार : नदिर्शकांना हुसकावून लावण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी सरकारची यािचका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अॅटर्नी जनरल सलमान बट यांनी संसदेभोवतीचा वेढा उठण्याचा आदेश देण्याची मागणी केली होती. त्याला सरन्यायाधीश नसिरूल मुल्क यांनी नकार दिला. लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी सुरू होती.
लष्करप्रमुख- शहाबाज शरीफमध्ये चर्चा : लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी नवाझ यांचे लहान बंधू शहाबाज शरीफ यांची दोन दिवसांत दुस-यांदा भेट घेऊन चर्चा केली. जनरल शरीफ यांनी सरकारने नदिर्शकांसोबत सकारात्मक चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी रात्री सरकारच्या पाचसदस्यीय शिष्टमंडळाने इम्रान यांच्या सहासदस्यीय पथकाशी चर्चा केली.

घटनाबाह्य बदलास विरोध
पाकिस्तानमधील कोणत्याही घटनाबाह्य बदलास आपण पाठिंबा देणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. घटनात्मक व निवडणूक प्रक्रियेद्वारे शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. आमचा त्यास पाठिंबा आहे, असे विदेश मंत्रालयाच्या उपप्रवक्त्या मेरी हार्फ यांनी सांगितले. मौलवी कादरी आणि इम्रान खान यांच्या बंदमुळे राजधानी इस्लामाबादमध्ये अघोिषत बंदची िस्थती निर्माण झाली आहे.

हाक देशव्यापी आंदोलनाची
तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी गुरुवारी कठोर भूिमका घेत सरकारसोबतच्या वाटाघाटीतून माघार घेतली आणि देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. इम्रान यांच्या समर्थकांसोबत पाकिस्तान अवामी तेहरिकचे (पीएटी) प्रमुख मौलवी तािहरुल कादरी यांच्या हजारो चाहत्यांनी संसद परिसरातील रेड झोनमध्ये ठिय्या दिला आहे. या भागात संसद भवन, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय आणि अनेक दूतावासांची कार्यालये आहेत. पीएटीच्या नेत्यांची बुधवारी सरकारच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली होती. यानंतर गुरुवारी नव्याने वाटाघाटी झाल्या नाहीत. शरीफ यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा करणार नसल्याची भूिमका खान यांनी बुधवारी रात्री घेतली होती.