आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Former Cricketer Imran Khan Refuse Marriage With Reham Khan

इम्रान खान यांनी गुपचुप निकाह केल्याचे वृत्त फेटाळले, वाचा कोण आहे रेहम खान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इम्रान खान आणि टीव्ही अँकर रेहम खानचे 'गुपचूप' लग्नाची चावडीवर जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, रेहन खानशी निकाह केल्याचे वृत्तात तथ्य नसल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान हे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आहेत.

इम्रान खान यांनी त्यांची पहिली पत्‍नी जेमिमा गोल्डस्मिथ हिला घटस्‍फोट दिला आहे. इम्रान आणि जेमिमा हिने 1995 साली पॅरिसमध्‍ये पारंपरिक पध्‍दतीने निकाह केला होता. दोघांना दोन मुलेही झाली आहेत. एकाचे नाव सुलेमान असून दुसर्‍याचे कासिम असे आहे. मात्र, 2004 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.

दरम्यान, 62 वर्षीय इम्रान खान आणि 41 वर्षीय रेहम खान या दोघांनी गुपचूप निकाह केल्याची खमंग चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. दोघांनी न‍िकाह केला असल्याचे वृत्त ब्रिटिश मीडियाने प्रसिद्ध केले होते. मात्र, इम्रान खान यांनी रेहम खानशी निकाह केल्याचे वृत्त फेटाळले आहे. ब्रिटिश मीडियाच्या वृत्तात तथ्य नसल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, इम्रान यांची बहीण अलिमाने म्‍हटले की, इम्रान आणि रेहम खान यांचा निकाह म्हणजे केवळ अफवा आहे. आमच्‍या कुटुंबियांना बदनाम करण्‍यांचा हा विरोधकांचा डाव असल्याचे अलिमा यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, कोण आहे रेहम खान...