आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Girl Malala Yusufzai Role To Bangladeshi Actor

मलालाचा रोल करण्यासाठी बांगलादेशी मुलीची निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारतीय चित्रपट निर्माता अमजद खान यांचा आगामी चित्रपट पाकिस्तानी कन्या मलाला युसूफजई हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटात मलालाची भूमिका करण्यासाठी फातिमा शेख या बांगलादेशी मुलीची निवड करण्यात आली आहे.
तालिबान्यांचा रोष पत्करून शिक्षणासाठी संघर्ष करणारी व स्वत:चा जीव धोक्यात घालून शिक्षण घेणाºया मलालाच्या जीवनातील घटनांवर आधारित असेल. 15 वर्षीय मलालावर गेल्यावर्षी तालिबानी दहशतवाद्यांनी गोळी मारून जीवघेणा हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर प्रथम पाकिस्तानात व नंतर ब्रिटनमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यातून ती बरी झाल्यानंतर ती पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे. फातिमा शेखबाबत सुरक्षेच्या कारणास्तव सध्या इतर काहीच माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. परंतु चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर तिला समोर आणले जाईल, पण फातिमा शेख ही मलालासारखीच दिसते.
या चित्रपटाचे चित्रीकरण भारतासह लंडन, पाकिस्तान, इराणमध्ये होणार आहे. इंग्रजीत तयार होणाºया या चित्रपटाचे नाव ‘गुल मकाई’ असे ठेवण्यात आले आहे. बीबीसीच्या उर्दू वृत्तवाहिनीने या शब्दाचा वापर केला होता.