आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Media Report Hans Raj Hans Accept Islam

गायक हंसराज हंस यांनी इस्लाम धर्म कबूल केला, मुलाने नाकारले वृत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- सूफी गायक हंसराज हंस यांनी इस्लाम धर्म कबूल केला आहे, असे वृत्त पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी दिले आहे. हंस यांनी लवकरच मदीनात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'पाकिस्तान अफेयर्स' आणि 'यू न्यूज टीव्ही' पोर्टल्स यांनी दावा केला आहे, की हंस यांनी लाहोरमध्ये आमच्याशी बोलताना ही माहिती दिली. यात हंस यांनी म्हटले आहे, की बऱ्याच कालावधीपासून मी इस्लामिक साहित्य वाचत आहे. या धर्मातील मान्यतांवर माझा विश्वास वाढला आहे. मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. आता मी लवकरच मदीनात जावू इ्च्छित आहे.
दुसरीकडे, जालंधर येथे राहत असलेला त्यांचा मुलगा युवराज हंस यांनी ही बाब फेटाळून लावली आहे. माझ्या वडिलांनी धर्म बदललेला नाही. ते सध्या जालंधर येथेच आहेत. त्यांची तब्बेत सध्या ठीक नाही. त्यामुळे ते बोलू शकत नाहीत, असे सांगितले आहे.
मोहम्मद युसूफ हे नवे नाव धारण केले- पाकिस्तानी मिडीयातील बातम्यांनुसार, हंस यांनी आता मोहम्मद यूसूफ हे नाव धारण केले आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र संगीत जगतात त्यांचे नाव पहिल्यासारखेच हंसराज हंस हेच राहील. ते चार दिवसापूर्वी लाहोरमध्ये आले होते. येथेच त्यांनी धर्म बदललला. हंसराज हे लाहोरमध्ये इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठीच आले होते.
कॅप्टन अमरिंदर यांच्याबाबतीतही अशाच आल्या बातम्या, पुढे वाचा...