आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Nuclear Weapons Islamist Terrorist May Steal :prof Parvez Hoodbhoy

इस्लामी अतिरेकी पाकिस्तानची अण्वस्त्रे पळवण्याचा धोका:प्रो. परवेझ हुडाभॉय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पाकिस्तानी लष्करात कट्टरपंथीयांचा वरचष्मा वाढत आहे. यामुळे तेथील अण्वस्त्रे इस्लामी दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोका असल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानचे वैज्ञानिक आणि संरक्षण विश्लेषक प्रो. परवेझ हुडाभॉय यांनी केला आहे. हुडाभॉय हे आपल्या ‘कन्फंरटिंग द बॉम्ब’ या पुस्तकाच्या विमोचनासाठी सध्या लंडनमध्ये आहेत.

‘इंडियन जर्नलिस्ट्स असोसिएशन’च्या सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी हा दावा केला.
भारताप्रमाणे पाकिस्तानही 120 ते 130 अण्वस्त्रे बाळगून आहे. दोन्ही देश पाचवेळेस अणुयुद्धाच्या जवळपास पोहोचले होते. 1987, 1990, कारगिल युद्धादरम्यान (1999), 2001मध्ये भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ल्यानंतर आणि 2008मध्ये मुंबई हल्ल्यानंतर दोन्ही देशांत अणुयुद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता होती. नजीकच्या काळात पाकिस्तानी लष्करातील अंतर्गत ठिकाणांवरील हल्ल्यांमुळे दिसून येते की लष्करात कट्टरपंथवाद वाढत आहे. यामुळे देशाची अण्वस्त्रेच दहशतवाद्यांच्या हाती पडण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननेही मान्य केले होते की त्यांना भारतापेक्षा अधिक धोका अंतर्गत कारणांमुळे आहे.