आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 30 जुलै रोजी, रमजानमुळे तारीख बदलली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - रमजानच्या महिन्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आठवडाभर आधी, 30 जुलै रोजी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निकटवर्तीयाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीत हा आदेश बजावण्यात आला.

खासदारांना रमजानच्या धार्मिक कार्यात सहभागी व्हावे लागते. त्यामुळे निवडणूक अलीकडे घेण्याची मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने 6 ऑगस्ट रोजी निवडणूक जाहीर केली होती. पीएमएलएनचे अध्यक्ष राजा जफरूल हक यांनी याचिका दाखल केली होती. सत्ताधारी पीएमएलएन पक्षाचे मामनून हुसैन आणि
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे रझा रब्बानी यांनी बुधवारी उमेदवारी दाखल केली.


शरीफ समर्थकाचा विजय निश्चित
हुसेन कराचीतील आघाडीचे व्यावसायिक असून शरीफ यांचे ते विश्वासू नेते आहेत. हुसेन यांचा जन्म 1940 मध्ये आग्रा येथे झाला होता. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पार्टीने माजी न्यायमूर्ती वजिहुद्दीन अहमद यांना उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त काही सामान्य नागरिकांनीही अर्ज दाखल केला आहे. चार राज्य असेंब्ली व नॅशनल असेंब्लीतील सदस्य राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करतील. राजकीय समीकरणानुसार पीएमएलएन पक्षाचे उमेदवार विजयी होतील, अशी अपेक्षा आहे. हुसेन यांनी विरोधकांनाही आपल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नव्या राष्ट्राध्यक्षाचा 8 सप्टेंबर रोजी शपथविधी होईल.