इंटरनॅशनल डेस्क - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकांना स्वच्छतेविषयी जागरूक राहायला हवे. त्यांच्या या संदेशाचा लोकांवर एवढा प्रभाव पडला की, ही बातमी वार्यासारखी संपूर्ण देशात पोहोचली. देशातच नव्हे तर सीमेवरील पाकिस्तानी सैन्यावरही या बातमीचा परिणाम पाहायला मिळाला.
झाले असे की, जम्मू काश्मीरच्या आरएस पुरा येथील भारतीय जवान स्वच्थ भारत अभियानासाठी
आपल्या चौक्या झाडत होते. त्यांना सफाई करताना पाहून पाकिस्तानी रेंजर्सनाही जोश आला. त्यांनीही स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेत हातात झाडू घेतले आणि आपल्या चौक्या झाडण्यास सुरूवात केली. त्यावेळी एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) च्या फोटोग्राफरने हा फोटो काढून आपल्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला.
पुढील स्लाईडवर पाहा, एएनआयने ट्टीवटरवर टाकलेला फोटो....