आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतच शत्रू क्रमांक एकः पाकिस्‍तानी कट्टरवादी नेत्यांनी ओकली गरळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानातील कट्टरवादी नेते पाकिस्‍तानी जनतेला भारताविरोधात भडकविण्‍याचे काम करीत आहेत. जमात-उद-दावा या संघटनेचा म्‍होरक्‍या हाफिज सईदने पुन्‍हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली. भारत पाकिस्‍तानचा शत्रू क्रमांक 1 असल्‍याचे सांगून भारतावरच नियंत्रण रेषेचे उल्‍लंघ केल्‍याचा आरोप सईदने केला.

शुक्रवारची नमाज अदा केल्‍यानंतर सईदने केलेल्‍या भाषणात भारतविरोधी भावना भडकविण्‍याचे काम केले. तो म्‍हणाला, भारतानेच प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेचे उल्‍लंघन केले. त्यात पाकिस्‍तानी सैनिकांचा मृत्‍यू झाला. पाकिस्‍तान सरकारने पाश्चिमात्‍य देशांच्‍या दबावाखाली भारताला 'मोस्‍ट फेव्‍हरड नेशन' दर्जा दिला. परंतु, भारताने कधीही पाकिस्‍तानला मित्र मानले नाही. भारत कायम पाकिस्‍तानचा शत्रू क्रमांक 1 होता आणि राहणार आहे. यासाठी भारतातील हिंदूंची व्‍यापारी मानसिकता जबाबदार असल्‍याचे तो म्‍हणाला.


सुन्‍नी इत्तेहाद काऊंसिलच्या नेत्‍यांनी भारतीय सैनिकांचया गोळीबारात 3 सैनिकांचा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप केला आहे. या नेत्‍यांनी भारताला पाकिस्‍तानचा मोठा शत्रू असल्‍याचे ठरविले. भारताला 'एमएफएन' दर्जा देण्‍यासही त्‍यांनी विरोध केला. भारतामुळे पाकिस्‍तानची फाळणी झाली आणि बांगलादेश वेगळा झाला, असा आरोपही त्‍यांनी केला.