आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्‍येष्‍ठ पार्श्‍वगायिका रेश्‍मा यांचे कॅन्‍सरमुळे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तान-पाकिस्‍तानच्‍या प्रसिद्ध गायिका रेश्‍मा यांचे आज (3 ऑक्‍टोबर) सकाळी निधन झाले. घशाचा कर्करोग झाल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर लाहोरच्‍या एका रूग्‍णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. रूग्‍णालयातील सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, रेश्‍मा गेल्‍या एक महिन्‍यापासून कोमात होत्‍या.

रेश्‍मा यांचे भारताशी अनोखे नाते होत. 1947मध्‍ये राजस्‍थानच्‍या बिकानेर येथील एका बंजारा परिवारात जन्‍मलेल्‍या रेश्‍मा या सुफी गायनासाठी प्रसिद्ध होत्‍या. भारत-पाकिस्‍तान फाळणीनंतर त्‍यांचे कुटुंबिय कराचीमध्‍ये स्‍थलांतरीत झाले होते.

'हिरो' या हिंदी चित्रपटातील त्‍यांचे 'लंबी जुदाई...' हे गाणे खूप गाजले होते. 'हिरो' चित्रपटाचे दिग्‍दर्शक सुभाष घई यांच्‍यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी रेश्‍मा यांच्‍या निधनावर शोक व्‍यक्‍त केला आहे.

'रेश्‍माजी आज आमच्‍या ह्दयात आहेत. मी जेव्‍हाही सुफी गाण्‍यांबद्दल विचार करतो. तेव्‍हा त्‍यांचेच नाव समोर येते', अशा शब्‍दांत सुभाष घई यांनी आपला शोक व्‍यक्‍त केला.

(रेश्‍मा यांचा फाईल फोटो. रेश्‍मा यांच्‍याबाबतीत अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...)