आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Taliban Stop Children From Going To Schools

तालिबान्यांचा नवा फतवा; मुलांना शाळेत जाण्यास बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- उत्तर वझिरीस्तानात मुलींवर शिक्षणाची बंदी घालणा-या पाकिस्तानी तालिबानने आता मुलांना शाळेत जाण्यास मनाई केली आहे. तालिबानांच्या फतव्यामुळे पालकांमध्ये घबराट उडाली आहे. तालिबानच्या शुरा या सर्वोच्‍च कौन्सिलने पालकांना धमकी देणारा संदेश सोमवारी जारी केला. मुलांना शाळेत पाठवू नका, असे तालिबानचा दहशतवादी हाफिज गुल बहादुरने संदेशात म्हटले आहे. वझिरीस्तानातील उत्तरेकडील पाच शाळांचा यात समावेश आहे.

दहशतवादी का भडकले? : उत्तर वझिरीस्तान भागातील मिरानशाह शहरातील एक महत्त्वाचा मार्ग सुरक्षा दलाने बंद केला. त्या मार्गावर सुरक्षा दलाने अडथळे निर्माण केल्याने वाहतूक करणे बंद झाले.

पुढे काय : वझिरीस्तान भागात तीन सेमी इंग्रजी सरकारी शाळा आहेत आणि 400 हून अधिक मुलींचा समावेश असलेले महाविद्यालय आहे. अगोदरच या भागातील इतर शैक्षणिक संस्थांना दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे चांगलाच फटका बसला आहे.