आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानची ‘जलील’ हरकत ‘युनो’त भारताने हाणून पाडली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रे - काश्मीर वादाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा पाकिस्तानने केलेला आगाऊपणाचा प्रयत्न भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पुन्हा हाणून पाडला. काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. उभय देशांमध्ये विविध करार झाल्यामुळे निरीक्षक पथकाचा मुद्दाच मागे पडला असल्याचा भीमटोला भारताने लगावला. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या जवानांच्या निर्घृण हत्येची संयुक्त राष्ट्रांमार्फत चौकशीचा प्रस्तावही भारताने धुडकावला.

15 देशांच्या सुरक्षा परिषदेचे जानेवारी महिन्याचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे. या अध्यक्षपदाचा फायदा घेत पाकिस्तानने शांती सेनेच्या विषयावर खुली चर्चा आयोजित केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक पथकात पाकिस्तानचा सहभाग असल्यामुळेच जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर शांतता राखणे शक्य झाल्याचा दावा परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांनी अध्यक्षस्थानावरून भाषण करताना केला. जलील अब्बास यांच्या या ‘जलील हरकतीला’(अशोभनीय कृत्य) भारतीय दूत हरदीपसिंग पुरी यांनी सडेतोड उत्तर दिले. सन 1972 च्या युद्धानंतर उभय देशात सिमला करार करण्यात आला होता.त्यानंतर निरीक्षक पथकाचा मुद्दाच निकाली निघाला. या करारावर दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या स्वाक्ष-या आहेत व उभय देशांतील संसदेनेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे पुरी म्हणाले.

काय झाले बैठकीत
सरहद्दीवर दोन भारतीय जवानांची हत्या करून पाकिस्तानी सैनिकांनी एका जवानाचे शिर कापून नेले होते. मात्र, भारतीय लष्करानेच नियंत्रण रेषा ओलांडून आमच्या चौकीवर हल्ला केल्याचा कांगावा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय निरीक्षक पथकाकडून चौकशी करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला. या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणार नाही. युनो पथकालाही चौकशीची परवानगी देणार नाही, असे भारताने ठणकावले.
पाकी अगोचरपणा आमच्यामुळेच नियंत्रण रेषेवर शांतता
सिमला करारामुळे संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षक पथकावर परिणाम नाही.
शस्त्रसंधीवर निरीक्षक पथकाकडून निगराणी असल्याने त्याचा निर्णय वैध
भारताचे ठोस उत्तर

सन 1949 ची शस्त्रसंधी रेषा केव्हाच निकाली
सन 1971 मध्ये सिमला करारांतर्गत नवी अस्तित्वात आली.
सिमला करारानुसार उभय पक्षी चर्चेद्वारेच मतभेदांचे निराकरण
भेटीसाठी उतावीळ
शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उभय देशांतील परराष्ट्र मंत्र्यांची भेट झालीच पाहिजे, असा आग्रह पाकिस्तानने धरला आहे. परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी-खार यांनी राजनैतिक अधिकाºयांमार्फत हा निरोप पाठवला असल्याचे वृत्त आहे.
संयुक्त राष्ट्राचे निरीक्षक पथक कुचकामी आहे. त्यावर होणारा खर्च इतरत्र वापरा.
हरदीपसिंग पुरी, भारतीय सदस्य, युनो