(ग्राफीक्स - दहशतवादाची स्थिती)
पेशावरमधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जोवर दहशतवाद जिवंत आहे तोवर लढाई सुरू राहील, अशी घोषणा केली. मात्र, सत्य वेगळेच आहे. दुसऱ-याच दिवशी याचा प्रत्यय आला. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहेमान लख्वी याला जामीन मिळाला. आता भलेही काही जणांना फाशी दिली जाईल. परंतु ज्यांच्या शिरांवर जगभरात इनाम आहे ते पाकमध्ये खुलेआम फिरत आहेत. लादेनही पाकमध्येच मारला गेला.हाफिज सईद, मसूद अजहर,
दाऊद इब्राहिम,मौलाना फजलुल्लाहसारख्या दहशतवाद्यांना आयएसआयचे पाठबळ संरक्षण आहे. "दिव्य मराठी'तून जाणून घ्या पाकच्या दहशतवादविरोधी लढ्यातील सत्य....
वाखन कॉरिडॉरतून येतात अतिरेकी, माजी लष्करप्रमुख सिंह यांचे संशोधन
माजी लष्करप्रमुखजन.व्ही. के. सिंह यांच्या संशोधनानुसार तझाकिस्तान पाक यांच्यात असलेल्या वाखन कॉरिडॉरमधून अतिरेकी पाक भारतात घुसखोरी करतात. हा भाग ३५० किमी लांबीचा आहे. यात तीन पर्वतराजी आहेत -कराकोरम, हिंदकुश आणि पामीर. याला चीनची हद्दही जोडलेली आहे. सर्वाधिकदहशतवादी तळ याच भागांत. येथेच हेरॉइनचे प्रचंड उत्पादन आणि तस्करी होते. या भागांत निगराणी आणि हल्ले करणेही अत्यंत कठीण काम आहे.
मोहीम फत्ते झाल्याचा केवळ देखावा...
- 2003 पासून आजवर 55 हजार पाकिस्तानी लोक हल्ल्यांत मारले गेले.
- 05 हजार लोक केवळ या वर्षी जानेवारीपासून मारले गेले आहेत.
- लादेन तालिबानी भागांत अबोटाबादमध्ये कित्येक वर्षे लपून बसला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, दहशतवादाविरुद्ध पाकच्या पाच मोठ्या कारवाया आणि त्यामागील सत्य...