आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परवेझ मुशर्रफ यांना मारण्यासाठी पाकमध्ये 100 कोटी रुपयांचे बक्षिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख व माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना जीवे मारण्यासाठी जमहूरी वतन पार्टीचे अध्यक्ष नवाबजादा तलाल अकबर बुगटी यांनी शंभर कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

तालिबानने दिलेल्या धमकीनंतरही पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे अखेर रविवारी मायदेशी आगमन झाले होते. चार वर्षांनंतर परतलेले मुशर्रफ येथे चार्टर्ड विमानाने दाखल झाले. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून कराचीतील सभा रद्द करण्यात आली होती.

इस्लामाबादमध्ये आज आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत नवाबजादा तलाल अकबर बुगटी यांनी सांगितले की, जी व्यक्ती मुशर्रफ यांना मारेल त्याला आम्ही शंभर कोटी रुपयांचे बक्षिस म्हणून देऊ. तसेच येणारी निवडणुक म्हणजे जनतेची धुळफेक आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगावर माझा विश्वास नसून, सामान्य जनतेचाही तो आता राहिला नाही. बुगाटी यांनी याआधीही मुशर्रफ यांना मारण्यासाठी बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती.

रविवारी, दुबईहून संयुक्त अरब अमिरातीच्या विशेष विमानाने मुशर्रफ पाकिस्तानातील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथून त्यांना थेट नियोजित ठिकाणी नेण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला होता. मुशर्रफ यांच्या आगमनानंतर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु स्थानिक प्रशासनाने त्यास परवानगी नाकारली. मोहंमद अली जिना यांच्या कबरीजवळ ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीसाठी आवश्यक असणारे एनओसी मागे घेण्यात आली. सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सिंध पोलिस विभागाचे प्रवक्ते इम्रान शौकत यांनी सांगितले. यासंदर्भात पोलिसांनी मुशर्रफ यांचा पक्ष ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगला तसे कळवले होते. त्यानंतर एपीएमएलने ही बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. एकूनच एपीएमएल पक्ष तालिबानीच्या धमक्यामुळे मुशर्रफ यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेताना दिसत आहे.