आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाहोर- बाहरिया शहरासह देशभरात सध्या बिलावल हाऊसची चर्चा रंगू लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे घर राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्यासाठी उभारण्यात येत आहे. 25 एकर परिसरात पसरलेल्या या घराचे शाही सुविधांसह अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था हे वैशिष्ट्य ठरणार आहे.
बाहरिया शहरात पाकिस्तानातील अनेक बड्या नेत्यांची खासगी घरे आहेत. त्यात अत्याधुनिक सुविधा असलेल्या या राजमहालाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. 1 लाख 89 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ भागात हा राजमहाल बांधण्यात आला आहे. नवाज शरीफ यांचे घर झरदारींच्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. शरीफ यांचे घरही चांगले शाही आहे. 300 एकर परिसरात ते पसरलेले आहे. रविवारी झरदारी लाहोरमध्ये दाखल झाले आहेत. लाहोरपासून काही अंतरावरील आपल्या नवीन घराचा लूक पाहण्याचा मोह झरदारी यांनाही आवरला नाही.
10 हजार क्षमतेची लॉन
राजमहालाच्या परिसरात एकाचवेळी 10 हजार लोक बसू शकतील एवढी हिरवळ आहे. घराभोवती उंच तटबंदीदेखील आहे. या भिंतीमध्ये सुरक्षाविषयक गॅझेट्स आहेत.
विमानासाठी धावपट्टी
झरदारी यांच्या घराच्या परिसरात छोट्या खासगी विमानांना उतरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष धावपट्टी तयार करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.