आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan\'s Prime Minister Meets Army Chief, Divya Marathi

पाक‍मधील सद्य:स्थितीबाबत नवाझ शरीफ यांनी घेतली लष्‍करप्रमुखांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी( ता. 26) लष्‍करप्रमुखाची भेट घेतली. सध्‍या सरकारच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहे. त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर नवाझ यांनी लष्‍करप्रमुख राहील शरीफ यांची भेट घेतली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांकडून पाकिस्तानमध्‍ये आंदोलन करण्‍यात येत आहे.
दोघांची बैठक पंतप्रधानाच्या निवासस्थानी पार पडली. शरीफ आणि लष्‍करप्रमुख राहील शरीफ यांनी राजकीय घडामोडी आणि इतर बाबींवर चर्चा केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्‍यात आले आहे. भेटीचा तपशील अद्यापही उपलब्घ झालेला नाही. इम्रान खान आणि तहीर उल कादरी यांच्या आंदोलनाविषयी लष्‍कराने अधिकृतरित्या कोणतेही भाष्‍य केलेले नाही. हजारो खान आणि कादरी समर्थक इस्लामाबादच्या रेड झोनमध्‍ये ठाण मांडून आहेत. संरक्षण दलाने आंदोलकांवर कारवाई केलेली नाही.