आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan\'s Special Court Rejects Musharraf Appeal

परवेज मुशर्रफ यांना दणका; कोर्टाने बजावला वॉरंट, देशाबाहेर उपचारावरील निर्णय राखीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांना पुन्हा एकदा कोर्टाने दणका ‍दिला आहे. राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेल्या मुशर्रफ यांना विशेष कोर्टाने आज (शनिवारी) वॉरंट बजावला आहे. याशिवाय पाकिस्तानाबाहेर उपचार करण्याची मागणी याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. मुशर्रफ यांना 7 फेब्रुवारीला कोर्टात उपस्थित राहण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहे.

ह्रदयविकाराचा त्रास होत असल्याने मुशर्रफ यांच्यावर लष्कर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाकिस्तानबाहेर अर्थात विदेशात उपचार करण्यासाठी परवानगी मिळावी, या आशयाची याचिका त्यांच्या वकिलांनी कोर्टात केली होती. मात्र, न्यायमूर्ती फैजल अरब यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधिशांच्या कोर्टाने वैद्यकीय अहवाल येईपर्यंत याबाबतचा निर्णय सुरक्षित ठेवला आहे. याशिवाय कोर्टाने मुशर्रफ यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी केला आहे. 25 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुशर्रफ यांन जामीन मिळू शकतो, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

कोर्टाने सांगिल्यानुसार, मुशर्रफ यांना देशाबाहेर उपाचारासाठी परवानगी देणे हे कोर्टाच्या क्षेत्राधिकाराबाहेर आहे. देशाबाहेर जाण्यास परवानगी नसणार्‍यांच्या यादीत मुशर्रफ यांचे नाव आहे.
पुढील सुनावणीला मुशर्रफ कोर्टात उपस्थित राहिले नाही तर त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचा इशाराही कोर्टाने दिला आहे.