आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने पुन्हा घेतली आडमुठी भूमिका, म्हणे चर्चेमध्ये अटी शर्थी नकोत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारताबरोबरच्या संबंधांबाबत पाकिस्तानची आडमुठी भूमिका कायम असल्याचे दिसते आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हायची असल्यास पाकिस्तान भारताची कोणतीही अट मान्य करणार नसल्याचे पाकिस्चतानने म्हटले आहे. पाकिस्चानने संरक्षण मंत्री अरुण जेटली यांचे वक्तव्यही पाकिस्तानने फेटाळले आहे. काश्मीरी नेते फुटीरवादी नसून ते स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या तसनीम असलम यांनी गुरुवारी म्हटले की, शांततेसाठी चर्चाही गरजेचीच आहे. त्यामुळे दक्षिण आशियालाही विकास आणि लोकांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करता येतील. दोन्ही देशांमधील चर्चा म्हणजे कोणत्याही एका देशाचे दुस-यावर उपकार नाही, हीच आमची भूमिका राहिली आहे.

संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी नवी दिल्लीमध्ये म्हटले होते की, पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची आहे की भारताचे तुकडे करणा-यांशी हे पाकिस्तानने आधी ठरवावे. तसनीम यासंदर्भात म्हणाल्या होत्या की, आम्हाला कोणतीही अट मंजूर नाही. काश्मीरचे नेते भारतीय फुटीरवादी नसून ते एका अधिकृत भागातील लोक आहेत. ते त्यांच्या अधिकारासाठी लढत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावात त्याचा उल्लेख आहे.'

कराची बंदर उघडणार
भारताला पाकिस्तानच्या मार्गावरून अफगानिस्तानला गहू निर्यात करायचा आहे. त्याबाबत विचारणा केली असता, परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'आम्हाला अफगानिस्तान आणि भारताच्या व्यवसायात अडथळा बनायचे नाही. भारतासाठी तर कराचीचे बंदरही उपलब्ध आहे.'