आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरेक्यांवर धडक कारवाई, हवाई हल्ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - उत्तर वझिरिस्तानमध्ये शनिवारी लष्कराने दहशतवाद्यांचा मुकाबला करतानाच हवाई दलाच्या मदतीने धडक कारवाई केली. दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई दलाने जोरदार हल्ले चढवले. मिरानशाह आणि बोया गावात हल्ले करण्यात आले.

दहशतवाद्यांची पाच गुप्त ठिकाणे तसेच हत्यारे, स्फोटकांना नष्ट करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईत आतापर्यंत 386 दहशतवादी आणि 20 जवानांचा मृत्यू झाला. कारवाईमुळे आतापर्यंत सहा लाख नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. सुरूवातीला लष्कराने पायदळ जवानांच्या साह्याने दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात अपेक्षित यश दिसत नसल्याने लष्कराने हवाई दलाची मदत घेतली आणि मिरानशाह व बोया गावांमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला. हल्ल्यात काही अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात आले.