आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak's Punjab Province Assembly Gets Its First Sikh Member

सरदार रमेश सिंग अरोरा पाकिस्‍तानमधील पहिले शीख आमदार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- सरदार रमेश सिंग अरोरा हे पंजाब प्रांतातून पहिलेच शीख आमदार बनले आहेत. अरोरा हे लाहोरपासून सुमारे 80 किलोमीटर दूर असलेल्‍या नरोवल जिल्‍ह्यातील असून ते पाकिस्‍तानातील गुरूद्वाराच्‍या प्रबंधक समितीशी निगडीत आहेत.

त्‍यांनी नव्‍या पंजाब विधानसभेच्‍या पहिल्‍या सत्रात इतर आमदारांबरोबर शनिवारी शपथ घेतली. पाकिस्‍तान मुस्‍लीम लीग (नवाज)यांनी अल्‍पसंख्‍याक समुदायासाठी आरक्षित असलेल्‍या जागेवरून अरोरा यांची नियुक्‍ती केली. 11 मेच्‍या निवडणुकीतील विजयानंतर पीएमएल (एन)ला पंजाब आणि केंद्रात सरकार बनवण्‍याची संधी मिळाली आहे.

अरोरा हे शप‍थविधीसाठी सलवार कमीज आणि केशरी रंगाची पगडी घालून विधानसभेत आले होते. हा आनंदाचा क्षण असल्‍याने आपण खास वेस्‍ट कोट, सलवार कमीज आणि पगडी तयार केली, असे त्‍यांनी माध्‍यमांना सांगितले. 1947 नंतर पहिल्‍यांदाच पाकिस्‍तानच्‍या विधानसभेत एक शीख आमदार झाला आहे. आपल्‍याला हे पद मिळाल्‍यामुळे खूप आनंद झाल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.