आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palestinian Israel Conflict Death Toll Rises To More Than 700, Divya Marathi

PICS: इस्रायलच्या हल्ल्यात आणखी 16 लोकांचा बळी, 17 दिवसात 718 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरूसलम/गाझा - पॅलेस्टाइन-इस्रायल दरम्यान गेल्या 17 दिवसांपासून चालू असलेल्या संघर्षात 718 नागरिक मारली गेली आहेत. गुरूवारी(ता. 24) हमासच्या नियंत्रणा खालील गाझाच्या प्रदेशावर इस्रायल रणगाड्यांच्या हल्ल्यात 16 लोक मृत्यूमुखी पडली. इस्रायलकडे जाणा-या विमानांची सेवा अमेरिकेच्या नॅशनल एव्हिएशन अॅथॉरिटीने पुन्हा सुरू करण्‍याचा आदेश विमान कंपन्यांना दिली आहे.

भारताने केले इस्रायलविरूध्‍द मतदान
संयुक्त राष्‍ट्राच्या मानव अधिकारी आयोगाने इस्रायल करत असलेल्या गाझावरील हल्ल्याविरोधात मतदान घेतले. यात भारतासह ब्रिक्स देशांनी इस्रायलविरूध्‍द आपले मत नोंदवले. 46 सदस्य संख्‍या असलेल्या आयोगात 29 राष्‍ट्रांनी मतदान केले, तर 17 सदस्यांनी तटस्थता स्वीकारली. एकमेव अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने मतदान केले. आम्हाला आशा आहे, की दोन राष्‍ट्रे शस्त्रसंधी करार करतील आणि पॅलेस्टाइनचा मुद्दा हा शांततेने सोडवला जाईल, असे संयुक्त राष्‍ट्रामधील भारताचे प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी म्हटले.

पुढे पाहा गाझा-इस्रायल संघर्षाशी संबंधित ताजी छायाचित्रे....