आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Paralyzed Doctor Performs Surgery Thanks Stand Wheelchair

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लकवाग्रस्त सर्जन करतात व्हीलचेअरवरून शस्त्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. टेड रमेल हे लकवाग्रस्त आहेत. हात वगळता त्यांचे संपूर्ण शरीर बधिर पडले आहे. तरीसुद्धा ते रुग्णांवर शस्त्रक्रिया करत आहेत.

मिसुरीच्या ओ फॉलन इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असताना 2010 मध्ये मज्जातंतूची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे डॉ. टेट यांना लकवा आला होता. तब्बल दोन वष्रे पलंगावर काढल्यानंतर त्यांना जाणीव झाली की, ते अशाप्रकारे संपूर्ण आयुष्य व्यतीत करू शकणार नाहीत. अशा स्थितीत लोक खचून जातात; परंतु डॉ. टेट यांनी परिस्थितीवर मात करत पुन्हा एकदा सेवा देण्याचा निर्धार केला. ते आता व्हीलचेअरवर बसून रुग्णालयात येतात. शरीर लकवाग्रस्त असले, तरी त्यांचे हात आणि डोळे मात्र चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे व्हीलचेअरवर उभे राहून ते आपल्या टीमच्या मदतीने रुग्णांवर शस्त्रक्रिया करतात. ते वर्षभरात साधारणपणे हजारापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करतात. माझी शारीरिक अवस्था चांगली नसल्यामुळे मी आता रुग्णाचे दु:ख समजू शकतो, असे डॉ. टेट म्हणतात.