आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात ‘बुरका अ‍ॅव्हेंजर’ मुलींसाठी अवतरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - वंडर वुमन, कॅटवुमन, सुपरगर्ल यासारखे कार्टून प्रचंड गाजले. मात्र पाकिस्तानात आता बुरका अ‍ॅव्हेंजर नावाचे कार्टून कॅरेक्टर येऊ घातले आहे.


मुलींच्या शिक्षणासाठी हे पात्र अन्यायाशी दोन हात करताना दाखवण्यात येणार आहे. मुलींचे शिक्षण बंद करायला लावणा-या वाईट प्रवृत्तीच्या मुलांना धडा शिकवण्यासाठी हे पात्र पुस्तक व लेखणीचा हत्यार म्हणून वापर करेल. बुरक्याच्या मदतीने धडा शिकवणारी ही महिला मूळ शिक्षिका असते. रात्रीच्या वेळी ती अशा प्रवृत्तींना वठणीवर आणण्याचे काम करत असल्याची ही कथा आहे. अ‍ॅक्शन-कॉमेडी अ‍ॅनिमेशनमुळे ही टीव्ही मालिका लहान मुलांच्या आवडीची होईल, असा विश्वास निर्मात्यांना वाटतो.