आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहाज येताच लिफ्टसारखा वर उचलला जाणारा पूल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्समधील बॉर्डिक्स शहराच्या गॅरॉन नदीवर असा पूल बांधण्यात आला आहे. जहाज येताच तो आपोआप लिफ्टसारखा वर जातो. अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच पूल आहे. पुलाच्या बांधकामास 2009 पासून सुरुवात झाली होती. शनिवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ऑलांद यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाची अजूनही चाचणी करण्यात येत आहे. हा पूल पुढल्या महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.


(छायाचित्र :जहाज येताच पुलाचा काही भाग असा वर उचलला जातो.)