आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paris Train Station Closed Due To Bomb Threat As 10 Arrested In Terror Raids

पॅरिसमधील रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी, धरपकड मोहिमेत 10 संशयीत जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - पॅरिसमधील 'द गरे दी आयईस्ट' हे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी मिळाली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन तत्काळ रिकामे करण्यात आले आहे. धरपकड मोहिमेत 10 संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या धमकीनंतर 'द गरे दी आयईस्ट' रेल्वे स्टेशन सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले आहे. पॅरिसमधील अन्य रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सर्व रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी पॅरिसमधील 'चार्ली हेब्दो' या मासिकाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. यात मासिकाच्या संपादकांसह 12 जणांचा मृत्यु झाला होता. दरम्यान, शुक्रवारी मिळालेल्या धमकीनंतर पॅरिसमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.