आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपटाने वाचवला मालकाचा जीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - घराला लागलेल्या आगीत पोपटाने मालकाचे प्राण वाचवल्याची घटना घडली. साऊथ वेल्समधील एका घराच्या बेडरूमला आग लागल्याचे दिसताच घरातील पोपटाने बेन रिस या अल्पवयीन मालकाला बाथरूममध्ये जाऊन सावध केले. या वेळी पोपटाने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता धाडस दाखवले. बेन घराबाहेर पडला. मात्र, पोपटाचा आगीत सापडून मृत्यू झाला. बेन घरी एकटा असताना बेडरूममध्ये धूप लावून तो बाथरूमध्ये गेला होता. त्यानंतर आग सर्वत्र पसरली.