आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
इस्लामाबाद - सन 1999 च्या कारगिल कुरापतीमागे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यासह चार जणांचे टोळके कारणीभूत असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त लेफ्टनंट जनरल शहीद अझिझ यांनी केला आहे. त्याची कल्पना पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही होती, असा दावाही त्याने केला आहे.
अझिझ यांनी शरीफ यांचा खोटारडेपणा उघडकीस आणला आहे. कारगिलवर आक्रमणाची माहिती सुरुवातीला केवळ मुशर्रफ, लेफ्टनंट जनरल मोहंमद अझिझ, फोर्स कमांड चीफ लेफ्टनंट जनरल जावेद हसन आणि 10 व्या कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल महमूद अहमद या चौघांनाच होती. अझिझ हे त्या काळात आयएसआय या संघटनेच्या अॅनालिसीस विंगचे प्रमुख होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.