आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवेझ मुशर्रफ यांना अखेर अटक; \'फार्म हाऊस\'च बनली कोठडी, दोन दिवसांचा ‍रिमांड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकि‍स्‍तानचे माजी राष्ट्रपती आणि माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. मुशर्रफ चक शहजाद येथील त्यांच्या आलिशान फार्म हाऊसमध्ये लपून बसले होते. परंतु फार्म हाऊसबाहेर पोलिस तैनात होते. मुशर्रफ यांनी नजरकैद करण्यात आले होते. मुशर्रफ यांना अटक केल्यानंतर न्यायदंडाधिकार्‍यांच्या दालनात हजर करण्‍यात आले आहे. मुशर्रफ आपल्या कारमधून कोर्टात पोहचले आहे. परंतु न्यायदंडाधिकार्‍यांनी मुशर्रफ यांनी दालनातून बाहेर काढून दोन्ही पक्षांच्या वकीलांसोबत चर्चा केली. न्यायदंडाधिकार्‍यांनी मुशर्रफ यांच्या अटकेला स्थगिती स्पष्ट विरोध केला.

मुशर्रफ यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मुशर्रफ यांचे फार्महाऊसचे तात्पुरत्या कारागृहात रुपांतरीत करून मुशर्रफ यांनी तेथे नजरकैदेत ठेवण्याबाबत त्यांचे वकीलांनी मागणी केली होती. मुशर्रफ यांची मागणी न्यायदंडाधिकार्‍यांनी मान्य करून मुशर्रफ यांचे फार्महाऊस 'तात्पुरते कारगृह' करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुशर्रफ यांना दोन दिवसांचा रिमांड सुनावन्यात आला आहे.

इस्लामाबाद हायकोर्टात गुरुवारी सुनवाणीदरम्यान न्यायाधीश शौकत अजीज सिद्दकी यांनी मुशर्रफ यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना अटक करण्‍याचे आदेश दिले. कोर्टाचे आदेश ऐकताच मुशर्रफ यांनी कोर्टातूनच धूम ठोकली होती. खासगी अंगरक्षकांच्या मदतीने आपल्या बुलेटप्रूफ गाडीतून पळून जाण्यात मुशर्रफ यशस्वी झाले होते. पोलिसांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला होता. परतु मुशर्रफ यांनी पोलिसांना चकमा दिला होता.

मुशर्रफ यांच्या चक शहजादमध्ये असलेल्या फार्म हाऊसबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आणि शेवटी पोलिसांनी मुशर्रफ यांना त्यांच्या फार्म हाऊस येथूनच ताब्यात घेतले आहे.

'चोर पळाला..चोर पळाला'च्या घोषणांनी इस्लामाबाद हायकोर्ट परिसर दणाणून गेला होता. परंतु मुशर्रफ यांचे प्रवक्ता रेजा बुखारी यांनी सांगितले की, मुशर्रफ यांनी पलायन केले नाही. मुशर्रफ गुरुवार दुपारी तीन वाजता सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज करणार आहे. आपल्या विधीतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

स्वत:वर हल्ला होण्याच्या भीतीमुळे मुशर्रफ हायकोर्ट परिसरात बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले होते. तसेच त्यांची गाडीही बुलेटप्रूफ आहे. विशेष म्हणजे त्यांनी खासगी अंगरक्षकांकडून सुरक्षा घेतली होती.

न्यायाधीश शौकत अजीज सिद्दकी यांनी मुशर्रफ यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. कोर्टाचे आदेश मिळतात पोलिस मुशर्रफ यांच्यापर्यत पोहचण्याच्या आतच त्यांनी आपल्या अंगरक्षकांच्या मदतीने कोर्टातून सगळ्यांच्या समोरच धूम ठोकली होती.

मुशर्रफ यांना सहा दिवसांची अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. मुदत संपल्यानंतर मुशर्रफ यांनी कोर्टाकडे पुन्हा जामीन अर्ज केला होता. मुशर्रफ यांच्यावर न्यायाधीशांचे अपहरण करून त्यांना नजर कैदेत ठेवल्याचा आरोप आहे. मुशर्रफ यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले होते. याप्रकरणी एफआयआर वकील चौधरी मोहम्मद असलम यांनी 11 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केली होती. परवेझ मुशर्रफ यांनी सन 2007मध्ये आणीबाणीच्या काळात न्यायाधीश इफ्तिखार मुह्म्मद चौधरींसह 60 न्याया‍धीशांचे अपहरण केले होते.