आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parvez Musharraf Challenges Rejection Of His Nomination Form

उमेदवारी फेटाळण्यास मुशर्रफांचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी कसूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. 11 मे रोजी होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुशर्रफ यांनी चार मतदारसंघांतून अर्ज भरले होते. कसूरसह अन्य तीन जागांसाठीचे अर्ज फेटाळण्यात आले.

दरम्यान, चितराल मतदारसंघातील मंजूर अर्जाला पाच जणांनी आव्हान दिले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोग 17 एप्रिल रोजी यावर निर्णय देणार आहे. लाहोर उच्च न्यायालयाने पीएमएलएन नेते नवाज शरीफ यांच्या मंजूर अर्जाला आव्हान देणा-या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेण्यास नकार दिला. मुशर्रफ यांचे वकील सलमान सफदर यांनी अखेरच्या दिवशी याचिकेद्वारे आव्हान दिले. मुशर्रफ दहा वर्षे राष्ट्राध्यक्ष होते. खैबर पख्तुनख्वाच्या चितराल मतदारसंघातून त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कसूरमधील त्यांचा अर्ज नामंजूर केला.